ढगाळला मंगळवार..!
ढगाळला मंगळवार..!


ढगाळाला मंगळवार
जागेवरून उठू देत नाही
सकाळच्या उत्साहाला
काहीही करू देत नाही
तो रवी सुद्धा चीड चीड
बाहेर येण्यासाठी करतो
पण कोवळ्या उन्हाला
इथे कोण दाद देतो
झाड सुद्धा स्तब्धच
आपल्या साखर झोपेत उभी
फुटक्या ढगांची फुलली
सुरेख सुंदर नक्षी नभी
हसत हसत भोवती फिरताना
ढग द्वाड चिडवत होता
सूर्याला सुद्धा तो आता
भेडसावून हसत होता
मी म्हंटले त्यालाही जरा
आळसात एक दिवस पडू दे
सकाळी सकाळी त्यालाही
एकदिवस आराम करू दे
वेळ मस्तवाल शत्रू होऊन
घड्याळात काट्यासवे सरकत होती
मलाही त्या वेळेचीच
मनोमनी सारखी कीव येत होती
म्हंटल घड्याळ बंद पडावं
आहे हेच दर्शन मनसोक्त घडावं
सूर्याला एकदा या ब्रह्मांडी
आपण थांबलेलं पहावं....!