Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

kishor zote

Inspirational

3  

kishor zote

Inspirational

दान (अष्टाक्षरी)

दान (अष्टाक्षरी)

1 min
130


दान असावे गुप्तच

कळू न दयावे कुणास

तीच हो खरी प्रचिती

घेण्या सदा स्वानंदास ॥ १ ॥


हिस्सा पाचवा करावा

दान सर्वच सांगती

नाही मार्ग चोखाळत

घेण्या दान अनुभूती ॥ २ ॥


होते जराशी मदत

हात म्हणा बुडत्याला

भागे गरज सहज

साथ अशी समाजाला ॥ ३ ॥


करा संकल्प आजच

द्यावे दान मनोभावे

जग होईल सुंदर

बंद व्दार ते खोलावे ॥ ४ ॥


Rate this content
Log in