चटके
चटके
चटके सोसले इतके,आता अश्रूंना ही हसू येते.
आयुष्याच्या जळत्या निखार्यावर,अजूनही मी वाटं शोधतेयं.
कधी भाजले ते पाय,कधी सुटला बांध,
मनाचा नाही तरी ही, खचला धीर.
चटके सोसले ईतके, देवाने ही देवपण सोडले.
नात्यांचे विस्तव घेऊन, मी आगीशी वैर केले..!!
