STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Tragedy Others

3  

दिपमाला अहिरे

Tragedy Others

चटके वास्तवाचे..

चटके वास्तवाचे..

1 min
207

कल्पनेच्या विश्वाला भान नसते सत्याचे,

खरे आयुष्य मात्र चटके वास्तवाचे.


जेव्हा ओझे वाढते जबाबदारीचे,

तेव्हाच कळतात चटके वास्तवाचे.


प्रसंगावधान साधण्याचे प्रयत्न अटीतटीचे,

पण ऊन बनुन क्षीण करतात चटके वास्तवाचे.


जरा घराजवळ सुखं येतेही कधीतरी मुक्कामाचे,

पण जीर्ण स्वप्नांचे मनोरे उधळुन लावतात

चटके वास्तवाचे.


मुखवटे दिसतात बोलणारे,हसणारे

नाती आपल्यासाठी की, आपण नात्यांसाठी

ओळखायला शिकवतात चटके वास्तवाचे.


उपेक्षित स्पर्धा जिवघेण्या अपेक्षांची

महागाई आणि जगण्याच्या शर्यतीत

टिकण्यास शिकवतात चटके वास्तवाचे.


मोल चुकवता दुःखाचे पडे कमतरता रोकडीची

किंमत शिकवतात जगण्याची चटके वास्तवाचे.


चितारतो रांगोळी मनीच्या अंगणात भरतो रंग स्वप्नांचे

पण विस्कटलेल्या रांगोळी प्रमाणे सत्य दाखवतात चटके वास्तवाचे.


पोहचता येत नसतं स्वप्नांना आभाळापर्यंत

तेव्हा त्यांना क्षीतीजापर्यंत खेचायचे असते

जाणीव करून देतात चटके वास्तवाचे.


कसेही असले आयुष्य मनापासून जगायचे असते

आयुष्य जगायला शिकवतात चटके वास्तवाचे.


प्रारंभाच्या आधीपासूनच अंत दुर उभा असतो,

झाले गेले शुन्याकार तरीही पुन्हा उभे राहण्यास शिकवतात चटके वास्तवाचे!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy