चंद्र होऊनी तू...
चंद्र होऊनी तू...
चंद्र होऊनी तू
रात्रीस विळखा घालतो
माझ्या अंगणी चांदण फुलता
तु हळू हळू वेचतो ...
एक एक चांदणी जेव्हा
तु माझ्या केसात माळतो
गती श्वासांची वाढता
उफाणलेला चंद्र माततो ...
धुंद मंद कुंद हवेचा वेग
जरा कुठे थांबतो
तुझ्या डोळ्यांच्या पापण्यात
माझ्या मनाचा धागा बांधतो...
कवडसा ओथंबुनी जेव्हा
मनाला माझ्या भिजवतो
चिंब चिंब रात्रीत पावसाच्या
पारिजात आणखीच बहरतो ...

