चला वाचूया
चला वाचूया
वाचाल तर वाचाल
म्हण तशी जुनी
पण वाचनानेच
माणूस होतो ज्ञानी आणि गुणी
कथा- कादंबऱ्या देतात
आत्मिक अनोखे सुख
हास्य-विनोद भागवतात
आनंदाची भूक
वाचनाने मिळतो
कमकुवत मनाला धीर
तयार होतात अनेक
अब्दुल कलाम सारखे ज्ञानी वीर
वाचनातून होते
बुध्दीची मशागत
धैर्याने मांडू शकतो
आपण आपले मत
धावायचे असेल जगाबरोबर
तर वाचन हवे सवे
तरचं आणि तरचं
तंत्रज्ञान उभे राहील नवे
म्हणून पुन्हा
वाचन करु सुरु
मानून ग्रंथ हेच गुरु
चला वाचूया
ठेवू आयुष्याचा नारा
तेव्हाचं माणूस होईल
ज्ञानी प्रगल्भ खरा.….
