STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

3  

Abasaheb Mhaske

Inspirational

चला गुढी उभारूया ...

चला गुढी उभारूया ...

1 min
796


चला गुढी उभारूया विकासाची

नवचैतन्याची ,उल्हासाची...

नाते जपूया आपुलकीची

निस्वार्थी अन जिवाभावाची ...


चला गुढी उभारूया प्रेमाची...

निनावी नात्यांची हर्षो उल्हासाची

वृद्धिंगत व्हावी शृंखला प्रेमाची

द्वेषमूलक भावनांना देऊनी मूठमाती


चला गुढी उभारूया सहिष्णूतेची

प्रेमाचीच भाषा बोलूया जगतीं ..

संत- महंत सांगून गेले आठवूया पुन्हा ...

पुन्हा एकदा म्हणूया हे विश्वची माझे घर



चला गुढी उभारूया सर्वंकष क्रांतीची ...

सविनय चळवळीची मशाल घेऊया आता

सप्तरंगी इंद्रधनुष्य होऊनि गगनी ...

झेंडा मानवतेचा अखंड मिरवू चला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational