चल ना आई
चल ना आई
चल ना आई
नको ना घेऊ मोबाईल हाती
बाळाकडे जरासे लक्ष असू दे
जुळू दे पहिल्यासारखी नाती
छान छान गप्पा गोष्टी करू
आकाशाची सफर करून येवू
छान छान गाणी गात
चाॅकलेटच्या बंगल्यात जावू
एक- एक घास भरवीत
गोष्ट सांगशील चांदोबाची
रात्री मात्र अंगाई गीत गात
देशील ऊब तुझ्या कुशीची
सतत धावत पळत असते
सगळ्या कामाची तुलाच घाई
खाऊ, कपडे,खेकणी नकोत मला
थोडासा वेळ दे ना आई