महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र आहे संतांचा
शिवबा आणि मावळ्यांचा
आदर्श कला-गुणवतांचा
संस्कार -संस्कृतीचा
मराठीपण जपणारा
सणवार साजरा करणारा
'अतिथी देवो भव' जाण ठेवणारा
थोरामोठ्यांच्या आदर करणारा
माणुसकी,मूल्ये जपणारा
शेतकरी राजाचा मान राखणारा
महाराष्ट्र आहे अमुचा
आम्हांला अभिमान त्याचा