चिमणीचे घरटे
चिमणीचे घरटे
चिऊताई चिऊताई
ये जरा इकडे,
तुझ्यासाठी बांधले
नवेनवे घरटे.
बोलव तुझ्या मैत्रिणींना,
मिळेल पाणी आणि दाना,
सगळ्यांची होईल मजा
आनंद मिळेल सर्वांना.
झाडावर आहे बांधले
तुझे छोटेसे घरटे.
काड्या, कुड्या, पंख,
सगळे तुझ्या मनासारखे.
वन वन तुझी चिऊ
मला पाहवेना,
तुझ्यासाठी मी ग
घरटे आणले ना !!
सुगरण माझी चिऊ
माहित आहे मला,
थोडी का होईना
विश्रांती मिळेल तुला.
