चिमणी
चिमणी
मानवाने स्वार्थासाठी
झाडे नष्ट केली
पशू पक्षी दुःखी झाले
मानवास विनंती केली
चिमणी म्हणाली मला
येऊ का मी तुझ्या घरी
देशिल का दाणापाणी
पोटा भरेल का माझे तुझ्या दारी
मी म्हणाले चिमणीला
देईन तुला खायला प्यायला
ये तू माणसाच्या
वस्तीला रहायला
माणसाने सोडली माणुसकी
चिमणी म्हणाली मला
घेईन का मला सोबतीला
देईन का जागा रहाण्याला
मी दिले वचन तिला
जीव लावीन तुला
नाही मरू देणार
कधी उपासी चिमणीला
आनंदाने लागली चिमणी
उड्या मारायला
दाणे उचलून भुरकन
गेली फिरायला .
