नाते संबंध
नाते संबंध
का हा दुरावा
आला तुझ्या माझ्यात
सांग शब्दांत
विश्वास होता
ती चर्चा समाजात
धोका नात्यात
विश्वासाने मी
नाते संबंध जपले
तू का तोडले
स्वार्थी जगात
प्रेमाच्या नात्यातही
विश्वास नाही
नाते सबंध
कर्तव्य विसरले
विभक्त झाले
नाही कोणात
राहीला तो विश्वास
नाते भकास
