आरती
आरती
जय देव ,जय देव ,जय आरोग्य विभागा
स्वच्छतेचे महत्व गावागावा सांगा !!धृ!!
गावामध्ये करा , प्रचार सुरु
सर्वांना आपण, एकत्र करु
स्वच्छतेचा मंत्र,सर्वांनी धरु
गाव आपण, स्वच्छ करु......1
गावातील कचरा, गोळा झाला
वेशीबाहेर, त्याला जाळू चला
दूर करा, साथ रोगाला
आरोग्य आपण,सुधरु चला ......2
स्वच्छ परिसर, करु आपण
झाडे लावून, पळवा प्रदूषण
निर्मल ग्राम, राबवू अभियान
गाऊ सर्व, स्वच्छतेचे गाण.....3
