Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Pawar

Inspirational

3  

Chandan Pawar

Inspirational

छत्रपती..

छत्रपती..

1 min
221


 रांज्याच्या पाटलाचा खात्मा 

चंद्ररावांची शिवबापुढे शरणागती ;

गोरगरिबांना न्याय देणारा 

जगातील पहिला छत्रपती .


मराठी वारे वाहू लागले

मावळ्यांचा सेना अधिपती ;

हिंदवी स्वराज्य स्थापणारा 

जगातील पहिला छत्रपती .


 शिवललकारी नभाला भिडली

 चकाके तलवारीची पाती ;

निद्रिस्तांना जागे करणारा 

जगातील पहिला छत्रपती .


शत्रूची दाणादाण उडवली 

आदिल- निजाम थरारती ;

गनिमी युद्धतंत्र देणारा 

जगातील पहिला छत्रपती .


 शाहिस्तेखानाची बोटे तोडली

अफजलखानाची केली माती ; 

औरंगजेबाला चितपत करणारा 

जगातील पहिला छत्रपती .


आग्रा दरबारी भेटीला गेले 

नाही मरणाची भीती ;

बादशहाच्या हाती तुरी देणारा

 जगातील पहिला छत्रपती .


मरणाशी क्षणोक्षणी भिडला

 पराक्रम केला असामान्य किती ?

प्रजेच्या हितासाठी झटणारा

 जगातील पहिला छत्रपती .


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational