छत्रपती संभाजीराजे
छत्रपती संभाजीराजे
सह्याद्रीचा शिलेदार
छत्रपती संभाजी राजे !
पुरंदरावर जन्मले
शिवपुत्र शूर शंभूराजे..
स्वराज्याचा हा छावा
लढला रयतेसाठी !
बलिदान दिले त्यांनी
स्वराज्य रक्षणासाठी..
औरंगजेबाने केले हाल
तरीही ताठ होता बाणा !
नाही शरण गेले
अखेर पर्यंत ताठ ठेवला कणा..
शूरवीर राजा महापराक्रमी
अजरामर झाले जगात !
नाही झुकला कधी
जगले सदा स्वाभिमानात..
असा महान होता राजा
शंभूराजे छत्रपती !
इतिहास घडवून झाले
स्वराज्याचा अधिपती....