Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Neha Ranalkar

Inspirational

3  

Neha Ranalkar

Inspirational

माणुसकी

माणुसकी

1 min
211


माणुसकी हाच असे

खरा मानवाचा धर्म |

फळाची इच्छा न धरता

करत रहावे सत्कर्म | |1| |


तृषार्तांना द्यावे पाणी पिण्यास

द्यावे भुकेल्यास खावया अन्न |

माणूसकी असेल मानवात तरच 

मानव जन्म होतो खरा धन्य | |2| |


अतिथी देवो भव जाणतो जो

सदा आणून धर्म आचरणात |

प्रत्येक सजीव प्राणीमात्रांबद्दल

भूतदया बाळगून ठेवी स्मरणात | |3 | |


सुखदुःखात प्रत्येक मानवाच्या

करत रहावी नित्य संगत |

दान धर्म करून गोर गरीबांच्या

जेवायला घालणे नित्य पंगत | |4| |


माणुसकीविना माणूस हा

असतो हाडांचाच सापळा |

भावनाहीन अन् संवेदनाशून्य

अशांना माणसातून वगळा | |5| |


Rate this content
Log in