आपलेही घर असावे
आपलेही घर असावे
आपलेही एक घर असावे
मागे पुढे त्याला दार लावावे
जमापुंजी सारीच जवळची
आपल्या त्या घराला लावावी
जेणे करून आयुष्याचे उरलेले दिवस
म्हणजे म्हातारपण त्यात सुखाने जावे
निघा इथून बाहेर कोणी न म्हणावे
पण दिवस कुठे राहिलेत तसे
मोठ्या आनंदाने मुलांचा
संसार थाटून देतात आई वडिल
आणि मग काही दिवसात तीच मुलं
त्या म्हाताऱ्यांना घराबाहेर काढतात
आणि म्हाताऱ्यांची सारी स्वप्न
तिथेच उधळून टाकतात
कसे आलेत हे दिवस
