Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Jadhav

Inspirational

3  

Sanjay Jadhav

Inspirational

नवं जग

नवं जग

1 min
213


भक्ती सुखाचे स्वर्गीय वारे 

ना कुणाची साथ ,ना सोबत 

एक नवी आशा ,फुले मनात 

नवं जग माझे , फिरते वर्तुळात 


डोळ्यात माझ्या जगण्याची आस 

ओलावती कडा , येता आठवण 

आतुरले मन माझेच स्वप्नी 

फुलेल सारे , मनामनातून 


कारुण्यरसाने भरली हृदये 

शिंपीत ,शिंपीत अश्रुंचे मोती 

वाट मी पाहून झाले अधीर 

कधी भेटशील ,हृदयमंदिरात 


सारं मनीच गुपित माझ्या 

सांगेन मी ,अलगूज राजा 

आतुरले मन ,होई बेभान 

सांगायचे मज तुझ्या कानात 


वाहणाऱ्या वाऱ्याच्या संगे 

मन ही वाहे झळुक होई 

लहरत लहरत झाडाफुलात 

सुगंध घेत ,चौफेर फिरत 


आनंदात मी गाणे गात 

मनाचे गुज जाणून घेत 

गाण्याची लकेर शोधत शोधत 

डोळ्यात पाहते ,नवं मी जग 


विसरले मी माझं अस्तित्व

झाले मी तल्लीन तुझ्या भेटीत 

हरवलं मन माझं शोधते 

आस तुझी रे माझ्या जगात 


Rate this content
Log in