Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pandit Nimbalkar

Inspirational

3  

Pandit Nimbalkar

Inspirational

आनंदानं जगू या

आनंदानं जगू या

1 min
162


आभास फसवे भोवतीचे तोडू 

खुलेपणाने स्वतःस समजू या 

सुख दुःखाला धैर्याने अनुभवत 

सोबत मिळून आनंदानं जगू या ||१||


दिखाऊ जगणं हव कशाला 

संयमाने यशाची गुढी उभारू या

जे आहे, जसे आहे, आपलं आहे 

आपल्या असण्याचा अर्थ समजू या ||२||


हरवले, दुरावले हेचं तर आयुष्य 

पुन्हा नव्याने आकाश शोधू या

पडले, धडपडले हरकत नाही 

फुलासारखे जगणे फुलवू या ||३||


सूर्यासारखं मावळून पुन्हा 

सूर्यासारखं रोज उदयास येऊ या 

चेहऱ्यावर खुलवून हसू लाडके 

चला आपण आनंदानं जगू या ||४||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational