छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज
दिसे प्रताप आठवा ..तोच शिवाजी घडवा
छत्रपती शिवाजी राजे
आठवावे रुप,आठवावा तो प्रताप
होऊन गेला,माझा असा शिवाजी
नाही संभव्ये, आता कुठल्याही युगात
राजात राजा माझा असा शिवाजी ..।।धृ।।
वडील मनी उधाण होते पेटले
जिजाऊ पोटी मग ते अवतरले
मराठी मुलुखात सुर्य भगवा उगवेल
एक छत्री मराठी शासन तो आणवेल ...
राजात राजा माझा असा शिवाजी...।।१।।
तप्त तप्त ती ज्वाला, अन्याय पेटली
आई जिजाऊ ती पाठी उभी थाठली
देऊन धडा तिने वाघ असा घडवीला
जिजाऊ गोरगरीबाची माय झाली..
राजात राजा माझा असा शिवाजी...।।२।।
गुलामगिरी,अन्याय पाठ त्याने तोडली
आई बहणीच्या अब्रू माझ्या शिवबाने राखली
काय किमया, अठरा पल्याड मातीची पुत्र जागली
घेऊन मंत्र नवा, शिवबाने हुंकार मारली...
राजात राजा माझा असा शिवाजी...।।३।।
समता, बंधूता न्यायाची धोरणे मांडली
पारदर्शकता माझ्या राजाने हो दाखवली
नव नव दृष्टिकोन माझ्या राजाने हो दिला
पगार, भूमी मापन, नौदल त्यांनी स्थापिला..
राजात राजा माझा असा शिवाजी...।।४।।
परस्त्री मातेसमान , दिला तिला हक्क
सती प्रथा मोडली, आई जिजाऊ पासून
नारीला देऊन ध्येय शिवबा माझा गेला
आई भवानी, दे वर ! पुन्हा शिवाजी घडो आजपासून...
राजात राजा माझा असा शिवाजी...।।५।।
