छत्री....
छत्री....
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
छत्री बाय छत्री बाय
आहेस ना तू बरी
वर्षभर बसून होती
कोपऱ्यात माझ्या घरी..
छत्री बाय छत्री बाय ...
पावसाच्या सुरू होतील
बघ आता सरी....☔☔
आला आला पाऊस
भिजेल गं मी पोरी....
छत्री बाय छत्री बाय ....
पावसात भिजून
होईन मला सर्दी
मला दे आसरा आता
ये माझ्या डोक्यावरी.☔☔
छत्री बाय छत्री बाय ....
पूर्वी होती काळी काळी
आता आहे रंगबिरंगी☔☔
नऊ काड्या असतात
तुला आधार देण्यापरी....
छत्री बाय छत्री बाय...