STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational Others

3  

Pandit Warade

Inspirational Others

छत्रछाया

छत्रछाया

1 min
249

ऐक रे माणसा । असावे सावध ।।

होईल पारध । कधी काळी ।।१।।


भारी गोड वाटे । संसार सागर।।

मायेचा बाजार । ध्यानी घ्यावे ।।२।।


माय बाप घरी । तेच तीर्थ काशी ।।

त्यांच्या चरणाशी । चारीधाम ।।३।।


संकट समयी । एक विठुराया ।।

धरी छत्रछाया । डोई तुझ्या ।।४।।


तोचि माय-बाप । तोचि बंधू सखा ।।

तुझा पाठीराखा । तोचि आहे ।।५।।


सावळा श्रीरंग । तोचि पांडुरंग ।।

भजनात दंग । व्हावे त्याच्या ।।६।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational