छंद
छंद
एकतरी छंद देवा
असावा तो पामराला
भरीस भर मानवा
चालन्या नि बोलण्याला।।धृ।।
खाली डोकं वर पाय
सरक तीर नाकाला
चित्र रेखाटने आज
रंग ब्रश शिकारीला ।।१।।
चवटकं नवटकं
चाराणे नि आठान्याला
पायली दीड पायली
बंन्दा त्या रुपयाला।।२।।
वित हात फुटा मध्ये
मोजतात जमिनीला
शंकू साखळी फलक
साधणे आराखड्याला।।३।।
अणू रेणू दवं बिंदू
जोड जोड पृथ्वी माला
भौतिक मिती शोधूया
शास्त्र संमत शोधाला।४।।
वेडी पिसी नि कर्मठ
साहित्य वेडी जन्माला
संगीत साजरी चाट
भेळपुरी नमनाला।।५।।
छंद जोपास तू भल्या
एकतरी आयुष्याला
आयुष्य सुकर कर
जसे बंन्दा रुपयाला ।।६।।
