STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Romance

3  

Manisha Wandhare

Abstract Romance

छडूनी मना गेली

छडूनी मना गेली

1 min
155

कधी ओल्या कळीचे भास छेडूनी मना गेली,

स्पंदनांची स्वप्ने ते खास छेडूनी मना गेली ...

अबोली पावलांची ही व्यथा होती रुतलेली ,

निजलेल्या रस्त्यांची आस छेडूनी मना गेली ...

मला भेटायला आला स्वप्नांचा काफीला ओला ,

जिव्हारी कोरडूनी श्वास छेडुनी मना गेली ...

अंधारुनी दिशा घायाळ झाली वाट केव्हाची ,

अघोरी लागलेला फास छेडूनी मना गेली ...

रित्या का ओंजळी माझ्या निवांती पडली फुले ,

सुगंधी मोगऱ्याचे पाश छेडूनी मना गेली ...

कधी ऐकून गाणी भाळलेली धावुनी आली ,

कृष्णाच्या बासरीचे मास छेडूनी मना गेली ...

मुक्याने बोलणे अंदाज अनोखा तुझा होता,

सखे लाजून माझा ध्यास छेडूनी मना गेली...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract