चैत्री पाडवा
चैत्री पाडवा
नवं वर्षे घेऊन आलं, पुन्हा नवी सुरवात
संकट सारे टळले, आता हसू आले मुखात
सारं काही थांबलं होतं, दोन वर्षा पासून
कित्येकांनी लग्ने केली, विलगीकरनात राहून
सगळं भयाण होतं, कोनाला काही सुधरत न्हवतं
गप्पांच्या बाजारात मग, एक एकाच म्हनं पटत होतं
आयुष्याची गती थांबली, तसे साऱ्यांना काय काय सूचू लागलं
कित्येकांच्या घरात फाटकी झोळी, अनं कित्येकांच आरामात भागलं
सगळं घडून मागं पडलं, आता तग धरतोय
चैत्री पाडव्याला नव्या दमाणं, नव्या वर्षात मी साऱ्यांच स्वागत करतोय
