चातक
चातक
काळी चोच, डोळे तांबडे तपकिरी
स्वाती नक्षत्राची एकटक वाट बघत
चातक पक्षी बसतो
झाडाच्या उंच शेंड्यावरी
जातात दिवसामागून दिवस
कंठ होतो रुक्ष, निर्जल
हा त्याचा प्रवास
बघावा रहावा असा
त्याचा स्वाभिमान
सोसतो किती यातना राहतो तरी हसतमुखी जेव्हा गर्जती सावळे मेघ तृष्णेचे थेंबाथेंबाने
मग तो शमन करी
वातावरण शांत असो वा तप्त
लढत रहावं, प्रयत्नपूर्वक सदा संयमाने
उशीरा का होईना पण
यश मिळेल हमखास
सदैव धरावी संयमाची कास चातकाप्रमाणे ..🙏😊
