चारोळी
चारोळी
संकटे येऊ दे किती ही
साथ न सोडणार कधी
जगु आठवणीत पुन्हा
मिळॅ भेटण्याची संधी.
तु प्रित पाखरा
मी तुझी मीत
सोबत राहाण्याची
जगाची रे ही रीत..
कळु दे जगाला
तुझी न माझी प्रित
चन्द्र आहे साक्षीला
फुलव पिसारा चित..
थाटु संसार नीट
जोडीने राहु फिट
हसत कधी रडत
एकमेकान्वर मीट
दोन मनाची भावना
झाडाच्या फान्दी वरती
जसा झोपाळा फिरावा
गगन भरारी जसी मारती ..
ह्रदयी प्रेम असेच असो
नुसताच देखावा नको
कळु दे आता जगाला
लाँक डाऊन करु नको..
मन पक्षी भावना
फिरते वारा वारा
बहरते आहे चोफेर
आता धिर दे जरा..