चारित्र्य
चारित्र्य
चारित्र्य
असावे शुद्ध
वेळच येऊ नये
करण्यास ते लोकांसमोर सिद्ध
चारित्र्य
न डागाळलेले
आरशासारखे असावे लख्ख
स्वतःच्या मानसिकतेने शिस्तीत जपलेले
चारित्र्य
चांगल्या विचारांचे
अंतकरणातून विश्वासाने जपलेले
नाना पैलू असती तयाचे
चारित्र्य
देई योगदान
समाजात शांतता राखूनी
होई प्रगती वाढवी मान
चारित्र्य
संयम ठेवी
चांगल्या पथावर नेई
सुसंगत, स्थिर,नैतिक बनवी
चारित्र्य
चांगले नसता
क्रोध, मत्सर अंगी
येऊनी पसरवी सामाजिक अशांतता