STORYMIRROR

BABAJI HULE

Abstract

3  

BABAJI HULE

Abstract

**चार ओळी **

**चार ओळी **

1 min
230

चार ओळी लिहाव्या वाटल्या प्रकाशावर 

परंतु अंधाराने आपलं अस्तित्व नाही सोडलं. 

चार ओळी लिहाव्या वाटल्या खरेपणावर 

परंतु खोटेपणाने तर संपूर्ण विश्वच व्यापलं II

चार ओळी लिहाव्या वाटल्या सुखावर 

परंतु दुःखाने कधी पाठ नाही सोडली 

चार ओळी लिहाव्या वाटल्या सबलीकरणावर 

परंतु दुर्बलपणाने हार नाही मानली  II

चार ओळी लिहाव्या वाटल्या नीतिमत्तेवर 

परंतु अनीतीने बिलकुल कमीपणा नाही घेतला 

चार ओळी लिहाव्या वाटल्या विश्वासावर 

परंतु अविश्वसाने आपला रस्ता नाही बदलला   II

चार ओळी लिहाव्या वाटल्या शीतलतेवर 

परंतु उष्णतेने आपला उष्मा नाही कमी केला

चार ओळी लिहाव्या वाटल्या निरोगीपणावर 

परंतु आजाराने आपला पिच्छा नाही सोडला II

चार ओळी लिहाव्या वाटल्या स्वछतेवर 

परंतु अस्वच्छता कायम हिणवतच राहिली 

चार ओळी लिहाव्या वाटल्या साक्षरतेवर 

परंतु निरक्षरतेचीव्याख्याच बदलत गेली   II

चार ओळी लिहाव्या वाटल्या ज्ञानावर 

परंतु आज्ञाने आपलं स्वरूप नाही बदललं 

चार ओळी लिहाव्या वाटल्या शांतपणावर 

परंतु रागीटपणाने सौम्यपणाला हिरावूनच घेतलं II

चार ओळी लिहाव्या वाटल्या सद्गुणांवर

परंतु निर्गुणाने प्रत्येकामध्ये आपला अंश ठेवला 

चार ओळी लिहाव्या वाटल्या सन्मार्गावर 

परंतु कुमार्ग हा तर लोकांनी दुसरा रस्ता शोधला II

चार ओळी लिहाव्या वाटल्या मानसिक समाधानावर 

परंतु असमाधानाने आपला अहंमपणा नाही सोडला 

शेवटी काय आपल्याच वाटेवर चार ओळी लिहिल्या 

आणि शब्दांचे मनोरे रचत गेलो, कविता होत गेल्या   II


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract