चांदणीचे अस्तित्व
चांदणीचे अस्तित्व
तू चांदणी आकाशाची
चमकणे कधी सोडू नको
तेज तुझेे तुझ्याजवळ
ओळख तुझेे मोल ग
नभांगण सारे तुला
विसरून जरी गेले
चंद्राच्या उजेडात
कमी तुला समजले
अवसेचा काळोख होता
फक्त तू प्रकाशली
जाणीव झाली तेव्हा तुझ्या
बहुमोल अस्तित्वाची
जाणीव झाली तेव्हा तुझ्या
बहुमोल अस्तित्वाची
