चाहता क्रिकेट देश(राष्ट्र)
चाहता क्रिकेट देश(राष्ट्र)
ग्राऊंड हा शब्द इतका
हृदयात घट्ट रुतून बसलाय
की ग्राऊंडला मराठीत
क्रीडांगण म्हणतात हे विसरून गेले...!
आणि या मैदानी खेळांनी
पण अशी दडी मारली की
क्रिकेटच्या वेडाने जणू
साऱ्यांनाच हद्दपार केले...!
ग्राऊंड दिसले की फक्त
आजकाल क्रिकेटच आठवते
आणि रणजी लीग करत करत
थेट वर्ल्ड कपावर गाडी येऊन थांबते...!
जळी काष्टी पाषाणी
ग्राऊंडचा या खेळाने ताबा घेतला
आणि इतर खेळांनी केंव्हा
काढता पाय घेतला ते कळलेच नाही...!
मोजकीच युवा मंडळी
प्रसार माध्यमातून झळकू लागली
इतर तरुण पिढी मात्र
अंघोळ न करताच टीव्ही समोर बसू लागली..!
देशी खेळ नजरे आड झाले
व्यायामाचे ही मॉल निघाले
तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात आले
प्रगतीने इथे मात्र हात टेकले...!
वाटते दिखाव्याची दुनिया
फारच विस्तारली
सात्विक जीवनाची खरोखरच
घडी मात्र विस्कटली....!
फायदा तोटा देवच जाणे
पण जीवन मात्र जगणे झाले उणे
आंनदाचे क्रीडांगण झाले सुने सुने
ग्राऊंडचे वाजता टीव्हीवरी तुणतुणे....!
चाहता क्रिकेटचा झाला
पहाता पहाता शिरजोर
प्रसार माध्यम ही आता
पहा कसे झाले माजोर...
देशासाठी म्हणत म्हणत
बाजार मांडला खेळातही भावनेचा
राष्ट्र भक्तीच्या नावाखाली
चाहता ही पहा फॅनच झाला क्रिकेटचा...
पाहणारे मौज मस्तीत गुरफटले
तारुण्य वाटते थोडे वाया गेले
पण त्यातही उर्मी टिकून आहे
देशा साठीची भावना मनात मात्र टिकून आहे....!
