STORYMIRROR

SANJAY SALVI

Fantasy

3  

SANJAY SALVI

Fantasy

बरसात,

बरसात,

1 min
582


आभाळ पोटुशी आल,

क्षितीजापाशी झुकल,

विजेची चाले लगबग,

बघ ओथंबून आले मेघ,

काळोख भरून आला,

पार छेदून अंधाराला,

वीज वाट दावी पावसाला,

सरसरल्या जलधारा,

सोबत सुसाट वारा,

झाले हलके फुलके मेघ,

पहा जडावली वसुंधरा,

मग प्रसवली काळी माती,

बीज अंकुरे डोकावती,

उन्हात न्हाउन किती,

सळसळण्या वर ती येती,

आता जीवन झाले कृथार्थ,

म्हणू लागली ती बरसात,

असे म्हणून ती बरसली,

अवघी धरा आनंदात न्हाली,

अवघी धरा आनंदात न्हाली,



Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy