बोल अनुभवाचे
बोल अनुभवाचे
शिवरायांची तलवार धारदार,
गरज आहे हाती घेण्या...
कर ताकदीची ढाल,
नराधमांना धडा शिकवण्या...
सखी, लेक तू सावित्रीची
तनामनात तुझ्या अंगार...
लढण्या जिद्दीने उतरव,
बदलण्या समाजाचे सार...
एक संधी आत्मविश्वासाला,
गरुडझेप घेण्या...
ठेव आदर्श जिजाऊंचा,
वाघीणीची चाल खेळण्या...
सळसळू दे रक्त
अन्यायाच्या प्रतिकारात
शिक गनिमीचा कावा... बाळग वाघनखे,
घालण्या वासनांधांच्या छाताडात...
