बोगनवेल
बोगनवेल
अगणित फुलांचा भार
अंगावर घेऊन
आधार मिळेल तसा बोगनवेल आकार घेत
फांदीच्या शेंड्यावरील काट्याचे परिवर्तन गुलाबी, जांभळा,पिवळ्या फुलोरयात
हिरव्या पानांत पांढराशुभ्र
फुल हे उठून दिसतं
रंगीत फुलांच्या मालिकेतली काहीशी दुर्लक्षित,आत्ममग्न सौंदर्य याचं मनाला भावतं
रस्त्याच्या दुतर्फा बागांमध्ये वेगवेगळ्या आकारात याला सजवलं जातं
ऊन, वारा, पाऊस...याला काही घेणं देणं नसतं
आपल्या विश्वात खुशहाल याच जगणं असतं
इतर फुलांच्या तुलनेत या नाजूक
गंधहीन फुलांकडे कोण
बरं बघतं.......
लक्षपूर्वक बघितल्यास.....
"स्वावलंबी जीवन" सदाबहार
सुख, समाधानाने, शांतीचा ताटवा फुलवावा बहारदार
"स्वावलंबी जीवनाच मोल" बोगनवेल जणू आपल्याला पटवून देतं...🙏😊
