STORYMIRROR

SHUBHAM KESARKAR

Tragedy Others

4  

SHUBHAM KESARKAR

Tragedy Others

बळीराजा !!

बळीराजा !!

1 min
497

गंध मातीचा हा सुहास 

काळ्या मातीतूनि आला

एक एक बियाणे पेरत

धान्य अनमोल देऊनी गेला!!धृ!!


उत्पन्न त्याचे थोडे तरी

मन त्याचे हे संतुष्ट

बिकट परिस्तितीवर मात करणाऱ्या

शेतकऱ्याचे स्वबळ अस्तित्व!!१!!


थोर जीवन मायबापाचे

पुण्य त्याचे हे फार

पोटाची खळगी रिकामी ठेऊन

पोसतो प्रत्येक जिवास!!२!!


रात दिस ढेकळात साऱ्या

जीवाचं करतो तो पाणी

एक एक विट रचून 

लिहितो त्याची ही कहाणी!!३!!


काळ्या मातीत त्याची खाण

राबतो त्यात स्वतःचे विसरून भान

घेऊन वाडवडिलांची ही वाण

शेतकरी आमचा कर्तव्यनिष्ठ सन्मान!!४!!


बोलावे तितके थोडे फार

दोन शब्दांचे दोन प्रकार

जाणतो तोच चित्रकार ज्याने

आत्मसात केले शेतकऱ्याचे जीवनसार

आत्मसात केले शेतकऱ्याचे जीवनसार!!५!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy