बळीराजा
बळीराजा
दिसा मागनं दिस गेले देवा रं...
अजून ही खातोया पिठलं भाकर....
कष्टाची कास त्यांनं धरलीया....
दिस रात घाम गाळतोया शेतात...
कशी ही जिंदगानी आयुष्याच्या वाटेला रं.....
पिकाले नाय पाणी
तरीबी राबतोया रं
मुलाबाळां शिक्षणासाठी
झटतोया रं....
हाता तोंडा आला घास
तो बी नेलाया सरकारनं रं
आला आला शेतसारा
लुबाडला रं.....
दिस रात हाकतोया
नांगर.....
जिवा शिवाची जोडी
सोबतीला रं.
झालीया आता लाही लाही रं
पेटलं आता सारं सारं रान रं....
आलीया आता वेळ रं....
लढण्या विरूद्ध अन्याया....
जीव गेला तरी,
आता माघार नाही रे....
हक्का साठी लढतोया आता...
जीव की प्राण रे....
कशी ही जिंदगी देवा रे.....
आता नाही राहिलीया अंगा खांद्या
ताकदं रं.....
जीव गेला आता
राबता राबता रं....
जगाचा पोशिंदा उपाशी
झोपतोया रं.....
आता तरी जाग यावी सरकार ला रं......
असा कसा अडकला...
राजकारणात रं....
जीवन आता संपवून
लागतोया जीवा हुरहुरं...
आवाज आता वाढवा रं
बळीराजाचं राज्य येऊ दे.....