बलात्कार
बलात्कार
बलपूर्वक केलेल अमानुष कृत्य म्हणजे बलात्कार
गोळयाला हाडामासांच्या कुत्र्यासारखं
फाडून खाणारं चित्र भयान
नीरव शांतीत कसायाला ही किव येईल असं
विक्षिप्त नाट्याचं लांछन वीरान
क्रूर भीषण पिसाळलेल पाशविक हास्य
शरीर लक्तरं आणि मनाचं झालं कोलीत विभित्स
जीवंत पणीच देहाचे झाले दाहसंस्कार
नकोत आता तथाकथित अंत्यसंस्कार
पुरे झाली देहाचि विटम्बना
नको आता मनाची आणखी कुचम्बना
झाली जीवनाची होळी, भिकारझोळी,
नको झाकुस चेहरा, तमाचा या तो पुरस्कर्ता आहे
निर्ढावलेल्या जुलूमी समाजाचा तो नग्न आरसा आहे
बस्स झाली शोकांतिका पूर्ण आता एकांकिका
हे नारी, ठोक मांडी सरसाव पुढे
हो सज्ज ह्या नराधमाचे विच्छेदन करण्याची
गरज आहे आता काळाची
ज्यांनी तुला कमी लेखलं, अबला ,कमजोर समजुन कुस्करलं,पायातली वाहाण समजलं ढोर पशु म्हणुन संबोधित केलं
ओसाड रानातल्या धानडयातली ही जरड कणसं
लायकी तरी आहे कां म्हणायला माणसं
मर्मबंधातील सल तुला मरेपर्यंत सलत राहील
गरळ त्या पुरुषी लिंगाची जिवंत तु असेपर्यंत आग ओकत राहील
राख होईपर्यंत भोगावे लागेल ते लिंग वेळीअवेळी
ध्यानी मनी स्वप्नि तरळत राहील ते लिंग वेळीअवेळी
पाशवी कुकर्माच वादळ घोंघावत राहील वेळीअवेळी
बेभान होऊन सैरावैरा डोक्यात थैमान घालेल वेळीअवेळी
जांघेखालचे रक्त व नितंबाचे ओरबाडे लपवू नकोस,
ते आहेत साक्षीदार त्यांच्या तिरडीचे
कर तु लिंगविच्छेदन त्यांचा अकलेच्या गर्वाचं
मर्दांगीच्या अभिमानाचं बुद्धिचं आणि तुस्डया पुरुषत्वाचं
विसरु नकोस तुझं स्त्रीत्वचं पुरुषाला जन्माला घालु शकतेस
ज्या दिवशी तु पुरुषी हुकुमशाहिचा करशील
बलात्कार,
त्या दिवशी मातृसतेचे प्रस्थापित होईल सरकार,
तु कर बलात्कार पुरुषी शरीराचा मुडदा पडेपर्यंत,
आणि कर नृत्य आनंदुन साधा माणुस होइपर्यन्त
तुझ्या हास्याचे दवबिंदु उडले पाहिजे कणाकणात धजणार नाही मग एकही पुरुष स्त्रीच्या अस्मितेला खुड़न्यास
