बलात्कार
बलात्कार
वासनेचा थैमान रोज माजतो
माणसातलं जनावरं रोज जागतो
रस्त्यावर दिसताच टपकते लाळ
राक्षसांचा खेळ तो चालतो
आई,बहीण स्त्रीचं रुप त्यांना हरपते
अब्रू रुपी कपडे टरटर फाडते
हिरावून स्त्रियत्वं नारीचं मरते
मौकाट ति कुत्रे पुन्हा येथे फिरते
बलात्कारावर रोजच होतो अत्याचार
जिथे-तिथे त्यांचाच दिसतो सदाचार
माणसांना उरलाच नाही आचार विचार
रोज होतात बलात्कार दिवसालं चार
जिकडे तिकडे ऐकले,वाचाले मी
येथे मात्र यावर कुणीच नाही तापले
दोन चार दिवस दाखवतात आक्रोश
मग येथे सगळे गड्या क्षमले
निकालाला लागतात वर्षोनुवर्षे
दोषारोपचे न्यायालयात भरतात सत्रे
निकाल येईल पर्यंत याचक कर्ता हरतो
यदाकदा वाचला तर यानेच मरतो, संपते संत्र
लागला निकाल तर पुन्हा ते अपिल करतात
नंतर वरच्या कोर्टात दोषी सुटतात
मिळणार न्याय ही आशा हारते हो
असेच न्यायालय आमचे चालतात हो
