बिनसलेला संवाद..
बिनसलेला संवाद..
अनेकांच्या गर्दीतही
तुझ्याविना एकाकी एकांत
आठवणींच्या सोबत असताना
एकट्याचाच एक आकांत
शब्दांची सतत रेलचेल
तुझ्या स्वरांचा निनाद नाही
सोबत असूनही आपल्या शब्दांचा
बिनसलाय संवाद काही
