भूतकाळाच्या पल्याड
भूतकाळाच्या पल्याड
घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकतो
अन् भूतकाळ निर्माण करत जातो ...
सेकंद मिनिट तास दिवस महीने वर्ष हे भूतकाळाचे सोबती
त्यांच्या पल्याड असतात कडू गोड आठवणीं चे डोंगर ,
या डोंगरावर कुठे असते हीरवळ तर कुठे विरानी तर कधी सापडतात अवशेष ...
या अवशेषांवरून फक्त कल्पना करता येते त्या वैभवी जगताची...
या जगतात असतात प्रत्येक क्षणांच्या नोंदी
नोंदी शोधता शोधता कधी येते हळवेपण ,कधी अगतिकता, तर कधी मिळते उभारी...
ती उभारीच तुम्हाला घेउन जाते आता भूतकाळाच्याही पलीकडे
वर्तमाना चा हात हातात देत उज्वल भविष्याकडे...
