STORYMIRROR

Priti Dabade

Fantasy Thriller Children

3  

Priti Dabade

Fantasy Thriller Children

भूत

भूत

1 min
208

झोपेत दिसली काळी आकृती

वाटली कसली तरी विकृती


होतं ते भूत भयानक

समोरच आलं ते अचानक


लांबलचक होते दात

अन् मोठ्या नखांचे हात


घाबरून झाले पाणी पाणी

गप्पच झाली होती वाणी


घालेल वाटलं झडप माझ्यावर

पांघरूण घेतलं मी डोळ्यावर


डोक्याला झाला होता ताप

भीतीने उडाला चांगलाच थरकाप


कसला होता कावा

देवाचा केला धावा


हिंमतीने उघडले हळूच पांघरूण

गेले होते ते तोपर्यंत दूर पळून


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy