भूपाळी..!
भूपाळी..!
लोळता लोळशी किति रे प्राणनाथा
तुझ्या आळसाच्या सांगू किती कथा
तुला न ठावे माझ्या मनीची व्यथा
भरली पोथडी भरता तुझ्या गाथा...
नाही सुटका कर्मापासून कोणास
रवी येतो सकाळी तुला पाहण्यास
चंद्रही हजेरी लावतो रात्री
अंगायी गीत जणू गाण्यास...
लाडका तू असला जरी सर्वांचा
माझा माहीत नाही तुज हिसका
आता लाडात येऊन
म्हणू नको मज तू पुन्हा ,बस का...
दिवसा वेड्या एकदा तरी
जागे राहून मज दाखीव
वाटू देत ना रे मला एकदा
जीवन आहे आपले रेखीव...
रात्रीस खेळ चालता
तू धुंद लोळतोस
उगाचच मग सकाळी सकाळी
आलोखे पिळोखे देतोस....
आता किटले कानही माझे
बहाणे तुझे जुने ऐकून
दे ती चादर अंगावरची
आता झटकून आळस फेकून...
संसार सुखाचा करूया की रे
दोघे मिळून आनंदाने
सुरुवात आज तरी होऊदे की रे
प्रभात समयी रवी प्रार्थनेने...
हुं ऐकता एकदाचे ,नशीब माझे खुलले
बारा आजही पुन्हा वाजले
पाहुनी आचम्बित मी झाले
पतीराज इतक्या लवकर कसे जागले....!!!
