भूक
भूक
मजबुरी माणसाला
कायकाय दिवस दाखवते,
कधी किंचित हसवते
कधी खूप खूप रडवते
एकीकडे दिसतो
आनंद भरमसाट,
दुसरीकडे मात्र
भुकेने व्याकुळ पहाट
का बर सोसाव्या लागतात
हाल अपेष्टा अतोनात,
का बर पसरावे लागतात
हताशपणाने लोकांसमोर हात
आधाशीपणे बघावे लागते
मिळेल आज किंवा उद्या काही
एका एका घासासाठी
कधी नमावे लागते भुकेलाही
कधी थांबणार हा
अमीर गरिबीचा खेळ,
कधी जुळणार गोरगरिबांचा
त्याच्या हातापोटाचा मेळ