परत
परत
परत तुला बोलावसं वाटतं
मागचे दिवस आठवावं वाटतं
झाली असेल चुक भूल तर
परत माफी मागाविसी वाटतं
शेवटच्या क्षणाला तुला पहावसं वाटतं
परत एकदा तुझ्या भावाचा मार खावासा वाटतं
परत तुला तुझ्या घरी बाईकवर सोडावसं वाटतं
होते ते दिवस भन्नाट
जेव्हा तू यशाच्या शिखरावर होतीस
पण काही नाही चाललं
तुझं आई वडिलांसमोर
लाडा कौतीकाची होतीसं ना
शब्द दिलेला पाळला तू
वचनाला जागलीस तू
परत जीवनात माझ्या येऊ नकोस
शेवटची घटका मोजतोय मी
दारूपायी वाया गेलो मी
पण तुला अधिकारी पाहून
मन माझं भरून आलं
माझ्या शब्दांना जागलीस तू
पण मी पुन्हा येईन
तुला परत मिळवायला
सध्या तू कुणाची आहेस
परत तुला बोलायला येईल
तुझ्या सोबत खेळायला येईल
गुणागोविंदाने संसार करायला येईल
