आई साहेब
आई साहेब
1 min
406
आई साहेब तुमच्या जन्माने
पावन झाली ही भारत भुमी ...
तुम्ही दिला या मातृभूमीला
रयतेचा राजा शिवछत्रपती ....
तुमच्या कर्तत्वाने घडला
या मातृभूमीतला इतिहास...
सह्याद्रीच्या दर्याखोर्यात
चोहीकडे आनंद झाला ..
दिले शिवबाना धड्डे तुम्ही
जगाला कळले शिवबा तुमच्यामुळे ..
आई साहेब तूम्ही होत्या
संस्काराचं बिज रवणार्या ...
शिवबाला घडवणार्या
भारताला गुलामगिरीतून मुक्त करणार्या....
होते जरी संसाराचे ओझे
तरी पेलले तुम्ही...
तुमचे उपकार कधीचं फिटणार नाहीत
नेहमी ऋणात राहू आम्ही...
आई साहेब तुमच्या जन्माने
पावन झाली ही भारत भुमी ...
