काॅ. डाॅ. अण्णा भाऊ साठे
काॅ. डाॅ. अण्णा भाऊ साठे


धगधगता ज्वालामुखी होता अदृश्य वाद्यांसाठी भुकंपच होता
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शामिल होता साहित्य नगरीतील जगविख्यात होता
शिवरायांचा रशियात पोवाडा गाणारा तू एकमेव होता
समाजाला जागृत करणारा भिम अनुयायी होता
तो काॅ. डाॅ. अण्णा भाऊ साठे होता
16 ऑगस्ट 1947 रोजी विधानसभेवर मोर्चा काढणारा तो समशेर होता
ये आझ़ादी झुठी हैं देश की जनता भूकी हैं
पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून दलितांच्या तळहातावर तरलेली आहे...
असे प्रखर तेजस्वी मत मांडणारे लिहिणारे ते वन मॅन शो होते...
वन मॅन आर्मी होते ते काॅ. डाॅ. अण्णा भाऊ साठे होते
p>1 ऑगस्ट 1920 रोजी झाला होता जन्म
2020 साली साजरं होत आहे जन्मशताब्दी वर्ष
जग ही करतंय त्यांना सलाम वंदन आहे आज तूम्हाला
नमन आहे आज तुम्हाला लोखंडे ही होतोय नतमस्तक
तुम्हाला जय लहुजी घालतोय आज जगाला नादच करायचा नाय
नाहीतर नादच खुळा बघतोस काय रागाने हिंमत केली लहुजीच्या वाघानं
भारतरत्नाचे हकदार तुम्ही आर्टीची स्थापना करणार आम्ही
संघर्ष चालू ठेवणार आम्ही पुढाकार घेत राहू आम्ही दिल्ली ही जिंकू आम्ही
आशीर्वाद राहू द्या पाठीशी तुम्ही
धगधगता ज्वालामुखी होता अदृश्य वाद्यांसाठी भुकंपच होता
तुम्हीच काॅ. डाॅ. अण्णा भाऊ साठे होता