- सैराट -
- सैराट -
काय करायचं पिढीचं
सैराटचं करत बसायचं
माय बापाला जलमध्ये टाकायचं
त्यांना यातना देत राहायचं
मागचा पुढचा विचार नाही करायचं
फक्त सैराटचं करत बसायचं
कोणाची पर्वा नाही करायचं
फक्त आपलं आपलंच पाहायचं
का कळना झालंय
का वळना झालंय
मनात आलं तेच करायचं
माय बापाचं विचार नाही करायचं
भावा बहिणीचा विचार नाही करायचं
फक्त सैराटचं करत बसायचं
का कळना झालंय
का वळना झालंय
युवा पिढीला कळना झालंय
दिलं शिक्षणाचं स्वतंत्र
दिलं फिरण्याचं स्वतंत्र
काय चुकतंय काय स्वतंत्रता देऊन
लाडा कौतीकाची माय माझी
लाडा कौतीकाचा बाप माझा
काय चुकतंय काय सांगा आम्हाला
पण का सैराट करताय
घरच्यांना अडचणीत आणताय..
का कळना झालंय ..?
का वळना झालंय..?
का लोखंडेचं काही लिहीण्यात चुकतंय काय
