आदी माया शक्ती
आदी माया शक्ती
आदी माया शक्ती दुष्टांचा विनाश कर तू
आम्हा लेकरांना आशिर्वाद दे तू
झाल्या असतील चूका मूका तर
आमच्या चूका पदरात घे तू
आदी माया शक्ती
जगाला कोरोनामुक्त कर तू
आमचं व्यसन बंद कर तू
निसर्गाचे संवर्धन करायला शिकव तू
मुलींना शक्तिशाली बनव तू
आदी माया शक्ती
नवसाला हक्केला धाव तू
गुणागोविंदाने रहायला शिकव तू
आदी माया शक्ती
बेरोजगारांचा प्रश्न मार्गी लाव तू
त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा तू
कोणी नाही वाली त्यांना
तूच आदी माया शक्ती
काही तरी चमत्कार कर तू
सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून दे तू
त्यांच्या हक्केला धावून जा गं आई
तूझ्या लेकरांवर कृपीदृष्टी कर गं आई
आदी माया शक्ती...................
हीच तुझ्या चरणी प्रार्थना गं आई......
