भुईचक्र
भुईचक्र
भुईचक्राचा वादळ
येतो बारा वर्षात
होतं नव्हतं संपवत जातं
सारं एका झटक्यात
माणसाची अरेरावी
होते सृष्टी कार्यात
बारा वर्षं शोषत जावून
हिशोब करते एका वारात
दुष्काळ आणि विपदा
नाळ तोडते पोटाची
मानवाच्या अरेरावीला
उत्तर देते काट्याची
अरेरावी वृत्तीला खिळ
बसवू पाहतो निसर्ग
पण कुत्राची शेपूट वाकडी
माणूस लावत जातो विसर्ग
निसर्गाच्या संरक्षणात
माणूस आहे स्थितीत
निसर्गाला दुखवून
नको जीवन जगू भितीत
