बहुगुणी योगा
बहुगुणी योगा
गतीमान जीवनात
नसे व्यायामाला वेळ
काम उरकेना तयां
सारा संगणक खेळ (१)
बैठे काम सांभाळता
भर वजनाची पडे
लवचिक तनू राहे
जिथे योगासन घडे (२)
शांत स्थिरशा चित्ताने
करी प्रथम ओंकार
जाग्या अंतरीच्या शक्ती
तनमनी ये होकार (३)
होई लवचिक तनू
नियमित सरावाने
गुरु आँनलाईनही
करा मार्गदर्शनाने (४)
स्नायूंमधे ये स्फुरण
गतीमान श्वासोश्वास
वाढे प्रतिकारशक्ती
होई रोगजंतू नाश (५)
नित्यनेमे करा योगा
पळवून रोगा लावा
आरोग्यसंपदा हाचि
असे मानवाचा ठेवा (६)
